आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाइट कर्फ्यूवरून टीका:तुमची नाइट लाइफ ती नाइट लाइफ आणि जनतेची पार्टी 'करो'ना; नाईट कर्फ्यूवर मनसे नेते संदीप देशपांडेंची सडकून टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येक वेळी कोरोनाची भीती दाखवत आहात, तर अमेरिकेसारखे पॅकेज द्या, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या रात्रीच्या संचारबंदीवर मनसेने टीकेची झोड उठवली आहे. “मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचे कारण काय आहे?” असे प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे विचारले आहेत.

संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. तुमची नाइट लाइफ ती नाइट लाइफ आणि जनतेची पार्टी 'करो'ना, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

“तुम्ही नाईट पार्ट्या करता, ते चालते, मग लोकांना बंधन का? कोण कुठे पार्ट्या करते, हे सर्वांना माहीत आहे” असा निशाणाही देशपांडेंनी ठाकरे सरकारवर साधला. व्हीआयपी पार्ट्यांना सवलत दिली जाते, गरिबांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचे नाही, हे कोणते लॉजिक आहे?” असा सवालही संदीप देशपांडेंनी विचारला. “लॉकडाउनमुळे यावर्षी लोकांचा कणा मोडला आहे. हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत. प्रत्येक वेळी कोरोनाची भीती दाखवत आहात, तर मग अमेरिकेसारखे पॅकेजही द्या” अशी मागणी संदीप देशपांडे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser