आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • MNS Leader Sandeep Deshpande Critisize Shivsena MP Sanjay Raut | Marathi News | Sanjay Raut Leaves For Mediation In Russia And Ukraine; MNS Leader Sandeep Deshpande's Sharp Blow

मनसेचा राऊतांना टोला:संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना; मनसे नेते संदीप देशपांडे यांचा खोचक टोला

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे पानिपत झाले. तर दुसरीकडे शिवसेनेला देखील राज्‍याबाहेर आपला ठसा उमटवता आला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महाविकास आघाडीत येत काय कमावले आणि काय गमावले ? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आणि आता यावरून मनसेनेही शिवसेनेवर टीका केली आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना झालेत. अशी खोचक टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

10 मार्च रोजी पंजाब, मणिपुर, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि गोवा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात शिवसेनेने गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवली होती. मात्र तिथे शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मतदान मिळाले आहे. त्यावरुन भाजपसह मनसेदेखील शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले असून, त्यात त्यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. संदीप यांनी ट्विट केले आहे की, "उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशानंतर संजय राऊत रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना झालेत. झुकेगा नही साला…” असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी करत संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश, गोवा या राज्यांमध्ये दौरे काढून जोरदार प्रचार केला होता. त्‍यांच्‍यासह आदित्‍य ठाकरे यांनीही गोवा आणि युपीत प्रचार केला. मात्र, त्याचे रुपांतर मतांमध्ये न झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संजय राऊतांवर अप्रत्यक्षपणे खोचक शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शनिवारी यासंदर्भात खोचक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी पुष्पा सिनेमातला डायलॉग देखील नमूद केला आहे. आता यावर राऊत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...