आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविनाश जाधव तडीपार:'हे शिवशाहीचं सरकार नसून येथे मोगलाई सुरू आहे', अविनाश जाधवांना तडीपार केल्यानंतर मनसेची आक्रमक भूमिका

ठाणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दोन वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यांना पाच जिल्ह्यांमधून तडीपार करण्यात आलं आहे. मात्र यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. हे शिवशाहीचं सरकार नसून येथे मोगलाई सुरू असल्याचं मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

'अविनाश आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, ठाण्याला येतोय कोण अडवतंय बघूया', असं आव्हान मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिलं आहे. पुढे ते म्हणाले की, अविनाश जाधव यांना काल तडीपारीची नोटीस तर दिली मात्र त्यांच्यावर 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या नर्सेसची कोव्हिडच्या कामासाठी नेमणूक सहा महिन्यांसाठी केली होती, त्यांना अचानक कामावरुन काढून टाकले. याच साठी अविनाश जाधव यांनी आंदोलन केलं, हा त्यांचा गुन्हा आहे का? सरकारची हुकूमशाही वाढत आहे. पण आम्ही गप्प बसणार नाही. असंही ते म्हणाले आहेत.

यासोबतच असे गुन्हा दाखल करुन आम्ही गप्प बसू असे सरकार आणि पालकमंत्र्यांना वाटत असेल तर हा तुमचा भ्रम असल्याचंहे ते म्हणाले आहेत. जेव्हा सरकार आलं तेव्हा हे शिवशाहीचं सरकार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र हे सरकार शिवशाहीचं नाही तर मोघलाईचं आहे. ही हुकूमशाही आम्हाला थांबवू शकत नाही. जिथे चुकाल तिथे प्रश्न विचारु' असं देशपांडे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...