आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेचे सवाल:प्रसिद्धीसाठी फेकलेल्या जाळ्यांमध्ये अडकण्याएवढी शिवसेना निर्बुद्ध नाही; पण 'या' कारणामुळे अडकतेय शिवसेना, मनसेला येतेय शंका

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या मुद्द्यावरून चित्रपट अभिनेत्री कंगना रनोट आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी पडली. हा वाद आता वाढतच आहे. यावरुन आता महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अभिनेत्री कंगना रनोटवर ती प्रसिद्धीसाठी असे वक्तव्य करत असल्याचा आरोप केला. तसेच कुणीतरी प्रसिद्धीसाठी फेकलेल्या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही. मात्र शिवसेना लोकांच्या त्रासावरील लक्ष हटवण्यासाठी मुद्दाम कंगनाच्या प्रसिद्धीच्या जाळ्यात अडकत आहे का? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.

मनसेनेच सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटवर व्हिडिओ पोस्ट करुन अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. ते म्हणाले की, 'भाविकांच्या मंदिरात प्रवेशाला बंदी, लाखो लोक बेरोजगार झालेले आहेत, आरोग्य व्यवस्था चांगली नाही यामुळे हजारो लोकांचे बळी जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरातच बसून काम करत आहेत यामुळे जनतेमध्ये नाराजी आहे. तसेच रेल्वेसेवा चालू नाही. यामुळे लोकांचे प्रवासाचे प्रचंड हाल होत आहेत. या सर्व परिस्थितीवरुन लक्ष हटवण्यासाठी शिवसेना एका अभिनेत्रीच्या प्रसिद्धीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकली आहे का? असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.'

पुढे बोलताना संदिप देशपांडे म्हणाले की, 'ज्या व्यक्तीला 5 पैशांची किंमत नाही अशी व्यक्ती काही वादग्रस्त विधान करुन प्रसिद्धीसाठी जाळे टाकत आहे. मात्र या जाळ्यात अडकण्याइतकी शिवसेना निर्बुद्ध नाही. तरीही शिवसेना मुद्दाम जाळ्यात अडकते आहे का? यामागे इतर सर्व विषयांवरील लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे का? लोकांना होणाऱ्या त्रासावरुन लक्ष हटवून या विषयावर लक्ष केंद्रीत करण्याचं हे षडयंत्र तर नाही ना? असे सवाल देशपांडे यांनी उपस्थित केले. तसेच याचा विचार माध्यमांनी आणि जनतेने करायला हवा असंही संदिप देशपांडे म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...