आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्वच धार्मिक स्थळंही बंद आहेत. यावरुन आता विरोधकांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्याने मंदिर उघडण्याची मागणी केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंदिर खुली करण्याची मागणी केली होती. आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, "पहले मंदिर फिर सरकार" "ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक" म्हणणारे लोकांना मुख्यमटंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत ह्याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामीत्व सिद्ध करण्याची चढाओढ ? असा सवाल त्यांनी कला आहे.
"पहले मंदिर फिर सरकार" "ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक" म्हणणारे लोकांना मुख्यमंत्री झाल्यावर मंदिरात जाऊ देत नाहीत ह्याला निर्णय शैथिल्य म्हणायचे की तथागतीत पुरोगामीत्व सिद्ध करण्याची चढाओढ ????
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 4, 2020
राज ठाकरेंनी पत्रात लिहिले की...
मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती 100 करण्याची परवानगी दिली जात आहे, मग सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल. असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.