आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोध:मागच्या सीटवरील व्यक्तीला बेल्टसक्ती आदेशाला मनसेचा विरोध

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारचाकी वाहनात मागील सीटवरील बसलेल्या व्यक्तीला सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्याच्या मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशाला मनसेने विरोध दर्शवला आहे. मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना ११ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट सक्ती करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. या सक्तीविरोधात मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून हा आदेश मागे घेण्याची मागणी केली आहे. सक्ती मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही मनसेने दिला आहे. या संदर्भातील पत्र मनसेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...