आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवासी मजूर:'आमची परवानगी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात यायचं नाही...' राज ठाकरेंचा योगी अदित्यनाथ यांना इशारा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर प्रदेशच्या कामगारांना काम देण्यापूर्वी आमची परवानगी घ्यावी लागेल- योगी

या कोरोना महामारी आणि लॉकडाउनदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. 'उत्तर प्रदेशातील मजुरांना काम द्यायचे असल्यास, आमची परवानगी घ्यावी लागेल,' असे योगी म्हणाले होते. त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रत्युत्तर दिले आहे. 'महाराष्ट्राची परवानगी घेतल्याशिवाय उत्तर प्रदेशातील कामगारांना महाराष्ट्रात येता येणार नाही', असा थेट इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

सध्या कोरोना आणि लॉकडाउनमुळे हजारोंच्या संख्येने प्रवासी मजुरांचे पलायन सुरू आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यातील मजूर आपापल्या राज्यात जात आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी, उत्तर प्रदेशातील कामगारांना काम द्यायचे असल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल, असे वक्तव्य केले होते. त्यावर मनसेकडूनही समाचार घेण्यात आला. याला प्रत्युत्तर देण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन राज ठाकरे म्हणाले की, 'उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर उत्तर प्रदेश सरकारची परवानगी लागेल असं तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मग जर तसं असेल तर ह्यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही हे ही आदित्यनाथ ह्यांनी लक्षात ठेवावं.'

'तसंच महाराष्ट्र राज्य सरकारनेही ह्या गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. ह्यापुढे कामगार आतमध्ये आणताना त्यांची नोंद करावी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो आणि त्यांची ओळख असली पाहिजे तरच महाराष्ट्रामध्ये त्यांना प्रवेश द्यावा हा कटाक्ष महाराष्ट्रानं पाळावा. तसंच ते जर उत्तर प्रदेशचे कामगार असतील तर त्यांना फक्त उत्तर प्रदेशमध्येच मतदानाचा हक्क मिळेल. कारण कायद्यानं आपल्याकडे एका मतदाराला दोन ठिकाणी मतदान करता येत नाही ह्याची जाणीव मुख्यमंत्री आदित्यनाथांनी ठेवावी, महाराष्ट्रानं आणि देशातल्या इतर राज्यांनीही ठेवावी...', असे राज ठाकरेंकडून सांगण्यता आले आहे.

बातम्या आणखी आहेत...