आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेचा आगामी निवडणुकांसाठी मेगाप्लॅन:1 ते 9 मार्चदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी भाषा दिनाला स्वाक्षरी मोहीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 1 ते 9 मार्च दरम्यान अयोध्येचा दौरा करणार आहेत. आज मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याबाबत माहिती दिली.

9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन असतो. अयोध्या दौऱ्याहून परतल्यानंतर राज ठाकरे पक्षाला संबोधित करतील. 9 मार्चनंतर राज ठाकरे राज्यातील विविध भागांचा दौरा करतील, असेही नांदगावकरांनी सांगितले. याशिवाय, निवडणुका जवळ आल्यामुळे 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिलपर्यंत मनसे सदस्य नोंदणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषा दिनाला स्वाक्षरी मोहीम

27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांची जयंती हा मराठा राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मनसे हा दिवस सण, उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे. या निमित्ताने मराठी स्वाक्षरी मोहीम राबवली जाईल, असे नांदगावकर यांनी सांगितले. त्या दिवशी, मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा, संस्थाचालक, मराठी प्रकाशक, संपादक, कवी, लेखक, खेळाडू यांचा सन्मान मनसे करणार आहे. मराठी वृत्तपत्रे आणि मराठी वृत्तवाहिन्या, नाट्य कलावंत आणि सिनेकलावंत यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असेही नांदगावकरांनी सांगितले.