आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचा स्टेज कोसळला:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाचा स्टेज कोसळला; गोरेगाव येथे घडली दुर्घटना, राज ठाकरे सुखरुप

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टेज कोसळल्याचा राग पत्रकारांवर काढण्यात आला असून, पत्रकारांना धक्काबुक्की करण्यात आली आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यक्रमाचा स्टेज कोसळला आहे. गोरेगावमधल्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळण्याची घटना घडली आहे. राज ठाकरे यांना कोणत्याही प्रकारे दुखापत झालेली नसून, ते सुखरुप आहेत. आज शिवजयंती आणि शाखेचे उद्घाटन करण्यासाठी ते गेले होते. त्यादरम्यान कार्यक्रम सुरू अचानक स्टेज कोसळल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. स्टेजवर गर्दी जास्त झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे देखील बोलले जात आहे.

गोरेगावमध्ये आज मनसेचा शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम होता. याच दरम्यान स्टेजवर अनेक मनसैनिकांनी गर्दी केली होती. स्टेजची क्षमता कमी असल्याने हा स्टेज अचानक खाली कोसळला. त्यात राज ठाकरे देखील खाली पडल्याची माहिती आहे. या दुर्घटनेदरम्यान पत्रकारांना देखील धक्काबुक्की करण्यात आली असून, स्टेज कोसळल्याचा राग पत्रकारांवर काढण्यात आला आहे. राज ठाकरे सुखरुप असून, ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत.

365 दिवस शिवजयंती साजरी करावी- राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करतो. याचा अर्थ आज ती साजरी करू नये असा होत नाही. महाराजांची जयंती एक दिवस नव्हे तर वर्षाचे 365 दिवस साजरी करावी असे त्यांचे कर्तृत्व आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

चांदिवली येथे मनसे शाखेचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. आज व्यासपीठावर भाषणासाठी नाही तर तुमचे दर्शन व्हावे यासाठी आलो आहे. अशी साद त्यांनी मनसैनिकांना घातली.

आज शिवजयंती आहे. मनसे पक्ष शिवजयंती तिथीने साजरी करतो. याचे कारण म्हणजे आपल्याकडे जेवढे सण येतात. दिवाळी येते गणपती येतात ते तिथीने येतात. गणपती गेल्यावर्षी कोणत्या तारखेला आले ते यावर्षीही त्याच तारखेला येतील असे नाही. कारण ते तिथीने येतात.

बातम्या आणखी आहेत...