आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसैनिकांनी लावले बॅनर:राज ठाकरेंच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट! घाटकोपरमधील बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या अनेक दशकांपासून देशाने केवळ एकच हिंदूहृदयसम्राट पाहिला आहे. ते म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांना शिनसैनिक हिंदुहृदयसम्राट म्हणायचे. मात्र आता दुसरे हिंदूहृदयसम्राट चांगलेच चर्चेत आले आहे. दुसरे हिंदुहृदयसम्राट म्हणजेच चक्क बाळासाहेबांचे पुतणे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे. खरेतर घाटकोपरमध्ये एका मनसैनिकाने आपल्या बॅनरवर राज ठाकरेंच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला आहे.

हिंदूहृदयसम्राट राज ठाकरे अशा अशायचे बॅनर लावल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिनसैनिक हिंदूहृदयसम्राट म्हणायचे, आता मनसेने हिंदूत्त्वचा मुद्दा हाती घेतला आहे. यानंतर त्यांनी राज ठाकरे यांनाच हिंदूहृदयसम्राट म्हणायला सुरुवात केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. तसेच आश्चर्य देखील व्यक्त केलं जात आहे.

आज घाटकोपर मध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या कार्यालयचे उद्घाटन आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसेने बॅनर्स लावले आहेत. यावेळी विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात लावलेल्या बॅनर्सवर हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख आहे. हेच बॅनर आता चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वी देखील एकदा असेच बॅनर ठाण्यामध्ये लावले होते. त्यावेळी मला हिंदूहृदयसम्राट म्हणून नका म्हणून राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना खडसावले होते.

बातम्या आणखी आहेत...