आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतील पोलिस अधिकारी सचिन वाझेंना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींचे टार्गेट दिले होते असा आरोप माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी केला यानंतर राजकीय वादळ आले आहे. आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याविषयावर परखड भाष्य केले आहेत. तसेच केंद्राकडे या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची मागणी केली आहे. अबानींकडून पैसे काढण्यासाठी हा कट रचला ही थेअरीच चुकीची असल्याचेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
महत्त्वाचा मुद्दा भरकटत चालला आहे
राज ठाकरे म्हणाले की, 'या प्रकरणाचा मुळ मुद्दा हा अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी कुणी ठेवली हा आहे. मात्र आता हे प्रकरण भरकटत चालले आहे. मुळ विषय अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवण्यात आली. आपल्या देशात प्रश्न निर्माण होतात. उत्तरे सापडत नाही. लोक हळुहळू ते सर्व विसरुन जाता. मुळात जी गाडी सापडली. त्यामधील जिलेटीन कुठून आले. असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. केंद्राने तत्काळ या प्रकरणाची सखोल चौकशी करावी'
एखादा गुजराती माणूस ज्या प्रकारे हिंदी बोलतो तसा 'या' पत्राचा टोन
राज ठाकरे यांनी या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, 'मुकेश अंबानी यांना कठोर सुरक्षा आहे. असे असूनही त्यांच्या घराजवळ गाडी चोवीस तास उभी असते. त्यामधील पत्र वाचले तर त्यामध्ये लिहिलेय की, निता भाभी आणि मुकेश भैय्या असे लिहितो. धमकी देणारा माणूस आदराने बोलतो का? एखादा गुजराती माणूस जसा हिंदी बोलतो तशा प्रकारचा त्या पत्राचा टोन आहे. गुड नाइट असे त्यामध्ये लिहिले आहे. नाइटला nitअसे लिहिले आहे.'
अंबानींकडून पैसे काढण्यासाठी हा कट रचला ही थेअरी चुकीची
'आता अंबनींकडून पैसे काढणे सोपे आहे का? ज्या मुख्यमंत्र्यांचे अबानींची संबंध आहेत. अशा मुकेश अबानींकडून पोलिस पैसे कशाला काढतील. यामुळे हे प्रकरण वेगळे आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याचे मुळ प्रकरण हे आहे की, ही गाडी कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली याचा तपास करावा. पोलिस प्रशासनावरील विश्वसा उडाला आहे. यामुळे केंद्राने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.'
मुख्यमंत्र्यांचे अंबानींसोबत मधुर संबंध आहेत
'वाझे प्रकरण निट पाहिले तर या वाझेला 17 वर्ष निलंबित होता. तो 58 दिवस तुरुंगात होता. त्याच्यानंतर इथे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार आले. त्यानंतर वाझे हे शिवसेना पक्षात आले. शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी वाझेंना कोण घेऊन गेले होते. अजून या प्रश्नाचे उत्तर आलेले नाही. त्यानंतर या वाझेंना पुन्हा पोलिस खात्यामध्ये आणावे असे उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सांगितले. हे फडणवीसांनी सांगितले आहे. याचा अर्थ हा वाझे शिवसेनेचे अध्यक्ष आणि आत्ताचे मुख्यमंत्री यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे. मुख्यमंत्री आणि मुकेश अंबानी यांचे अत्यंत मधुर संबंध आहेत. म्हणजे त्यांच्या शपथविधीलाही मुकेश अंबानी सहपरिवार हजर होते. मग वाझे, बॉम्बची गाडी अंबानींच्या घराखाली कुणी सांगितल्या शिवाय ठेवतील का?
परमबीर सिंहांची बदली का केली?
'बॉम्ब पोलिस ठेवतात हे आजपर्यंत आपण पाहिले नव्हते. या प्रकरणी वाझेंना अटक झाली. पण परमबीर सिंहांना का काढले? त्यांची बदली का केली हे अद्याप सरकारने सांगितलेले नाही. ते या प्रकरणात होते, तर मग त्यांची चौकशी न करता त्यांची बदली का केली याचे उत्तर सरकारकडून अद्याप आलेले नाही. त्यांची ट्रान्सफर केली जात आहे, यामधून काय साध्य होत आहे. तुमच्या अंगावर आलेली गोष्ट दुसऱ्याच्या खांद्यावर टाकून तुम्ही बाजूला होत आहात का? असा सवालही राज ठाकरेंनी राज्य सरकारला केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.