आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसे अध्यक्ष जाहीरपणे म्हणाले...!:मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरे शिवाजी पार्कवर, म्हणाले - 'मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बऱ्याच जण मास्क घालून होते

मराठी भाषा दिनानिमित्ताने शिवाजी पार्क येथे आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. मात्र आजही त्यांनी मास्क घातलेला नव्हता. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यभरात वाढत असतानाही ते सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता आले होते. दरम्यान पत्रकारांनी त्यांना ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’असे विचारले. यावर त्यांनी उत्तर दिले की, ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’. मी मास्क घालतच नाही असे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

शिवाजी पार्क येथे मनसेकडून मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेय. सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी राज ठाकरे यांनी सहकुटुंब कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे यांनी मास्क लावलेला होता. मात्र राज ठाकरे हे विना मास्कचे दिसले. यापूर्वीही अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये राज ठाकरे हे विना मास्कचे दिसले आहेत.

राज ठाकरे यांच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बऱ्याच जण मास्क घालून होते. मात्र राज ठाकरे यांनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. कोरोनाचा वाढता प्रभाव, आणि सातत्याने वाढणारे रुग्ण यामुळे मास्क घालणे सर्वांनाच अनिवार्य आहे. अशा वेळी पत्रकारांनी राज ठाकरे यांना तुम्ही मास्क लावलेला नाही, असे विचारले. यावर 'मी मास्क लावतच नाही, तुम्हालाही सांगतोय असे उत्तर माध्यमांच्या प्रतिनिधींना दिले.

बातम्या आणखी आहेत...