आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • MNS Sandeep Deshpande Aggressive On Thackeray Government Over Government Not Providing Facilities To People Going In Konkan For Ganesh Utsav

मनसे आक्रमक:गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी, मात्र बकरी ईद साजरा करणाऱ्यांना सुविधा; राज्य सरकारविरोधात मनसे आक्रमक

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परराज्यातील लोकांना पाठवले, पण कोकणात जाणाऱ्यांसाठी काहीच सुविधा नाही : संदीप देशपांडे

भाजप खासदार नारायण राणे यांनी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाऊ देण्याचा मुद्दा उचलून धरला असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही यात उडी घेतली आहे. गणपतीसाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना येत असलेल्या अडचणींच्या मुद्द्यावरुन मनसे राज्य सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांना अडचणी येतात. मात्र, राज्य सरकार बकरी ईद साजरी करण्यासाठी सुविधा देत आहे, अशी घणाघाती टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपाडे यांनी केली आहे. 

परराज्यातील लोकांना पाठवले, पण कोकणात जाणाऱ्यांसाठी काहीच सुविधा नाही 

परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात पाठवले, नंतर ते परतही आले, मात्र कोकणात जाण्याऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाने काहीच व्यवस्था केलेली नाही, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. 

... तर मनसे व्यवस्था करेल

राज्य शासनाने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी काही सुविधा करावी, कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी सरकार बसेसची सोय करु शकत नसेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना बसेसचे नियोजन करेल, आम्हाला शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणीही देशपांडेंनी केली आहे.