आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेचा सरकारला टोला:समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता कृष्णकुंज; संदीप देशपांडेंचा ठाकरे सरकारला टोला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनेकांच्या समस्याही सुटल्या आहेत

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून अनेक निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून अनलॉक अंतर्गत काही अंशी सूट देण्यात आली होती. परंतु राज्य सरकारकडून अनेक व्यवसायांना सुरू करण्यास मनाई केली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विविध संघटनांच्या प्रतिनिधी मागण्यांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे कृष्णकुंजवर दाखल होत आहेत. राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनेकांच्या समस्याही सुटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकासआघाडी सरकारला टोला लगावला आहे. समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे, कृष्णकुंज, असे ट्वीट करत संदीप देशपांडेंनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

समस्या अनेक उपाय एक ,महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

राज्य शासनाने आमच्यावरीलही निर्बँध हटवावेत यांसारख्या विविध मागण्या घेऊन बेस्टचे कंत्राटी कर्मचारी, केबलचालक, कोळी बांधव, बँडवाले, वारकरी, मूर्तीकार, डबेवाले, जिमचालक, कोळी महिला, वीजबिल ग्राहक, पुजारी, डॉक्टरांचे शिष्टमंडळ, ‘अदानी’चे अधिकारी इत्यादींनी राज यांच्याकडे धाव घेतली होती. या मागण्यांवर राज ठाकरेंनी थेट संबंधित मंत्र्यांना फोन लावत त्यावर तोडगा काढला होता. यातील अनेकांच्या समस्याही सुटल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...