आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी-ठाकरे भेटीवर प्रतिक्रिया:'बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?', मनसेचा खोचक टोला

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या या भेटीदरम्यान अजित पवार आणि अशोक चव्हाणांचीही उपस्थिती होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. राज्यातील मराठा आरक्षणासह विविध यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर मांडले. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या या भेटीदरम्यान अजित पवार आणि अशोक चव्हाणांचीही उपस्थिती होती. मात्र या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट झाल्याचे वृत्त आहे. आता या भेटीवरुन मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

'आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको .' असे संदीप देशपांडेंनी ट्विट करत म्हटले आहे. मनसेकडून राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवर सातत्याने टीका केली जात असते.

मोदींसोबतच्या भेटीविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधला. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ही भेट औपचारिक स्वरुपाची होती. ज्या विषयासाठी ही भेट झाली ते सर्व पंतप्रधानांनी एकून घेतले आहे. आता पीएम ते सर्व विषय सोडवतील, अशी अपेक्षा आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राज्यातील मंत्री अशोक चव्हाण देखील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...