आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन हवे की नको?:मनसेने घेतले सर्वेक्षण, शिक्षण, वाहतूक, वीजेसह अनेक प्रश्नांचा समावेश, मुख्यमंत्र्यांनी घरातच बसून केलेल्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात का? जनतेने दिला असा कौल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. दरम्यान जवळपास तीन महिने देशासह राज्य हे संपूर्णपणे लॉकडाऊन होते. सध्या अनलॉक सुरू असले तरी अनेक गोष्टींवरचे निर्बंध उठवण्यात आले नाही. या लॉकडाऊनचा परिणाम राज्यातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, शिक्षणावर परिणाम झाला, उद्योग ठप्प पडले. आता या सर्व प्रश्नांचा समावेश करत मनसेने एक सर्वेक्षण केले आहे. याचा कौलही मनसेने नुकताच जाहीर केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर हे सर्वेक्षण घेतले होते. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केलेल्या सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे. संदिप देशपांडे यांनी त्यांच्या फेसबुकवर हा कौल जाहीर केला आहे. या सर्वेक्षणात विविध मुद्द्यांवर आधारीत प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले. 54 हजार 177 नागरिकांनी या सर्वेक्षणात विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर आपली मते नोंदवली.

काय आहे सर्वेक्षणाचा कौल

1. लॉकडाऊन पूर्णपणे संपुष्टात आणला पाहिजे का?

 • होय : 70.3 टक्के
 • नाही : 26 टक्के
 • माहिती नाही : 3.7 टक्के

2. लॉकडाऊनचा तुमच्या नोकरी/उद्योगधंद्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे का?

 • होय : 89.8 टक्के
 • नाही : 8.7 टक्के
 • माहिती नाही : 1.5 टक्के

3. लॉकडाऊनच्या काळात आपल्या बुडालेल्या नोकरी/उद्योगधंद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली आहे का?

 • होय : 8.7 टक्के
 • नाही : 84.9 टक्के
 • माहिती नाही : 6.4 टक्के

4. राज्य सरकारने तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे का?

 • होय : 32.7 टक्के
 • नाही : 52.4 टक्के
 • माहिती नाही : 14.9 टक्के

5. शालेय शुल्काबाबत सरकारी धोरणांची अंमलबजावणी होत आहे का?

 • होय : 10.3 टक्के
 • नाही : 74.3 टक्के
 • माहिती नाही : 15.4 टक्के

6. लोकल रेल्वेसेवा आणि एसटी सेवा पूर्ववत सुरु झाली पाहिजे का?

 • होय : 76.5 टक्के
 • नाही : 19.4 टक्के
 • माहिती नाही : 4.1 टक्के

7. लॉकडाऊनच्या काळातील वीज देयकाबद्दल आपण समाधानी आहात का?

 • होय : 8.3 टक्के
 • नाही : 90.2 टक्के
 • माहिती नाही : 1.5 टक्के

8. लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला वैद्यकीय मदत वेळेत आणि योग्य मिळाली आहे का?

 • होय : 25.9 टक्के
 • नाही : 60.7 टक्के
 • माहिती नाही : 13.4 टक्के

9. या संपूर्ण काळात मुख्यमंत्र्यांनी घरातच बसून केलेल्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात का?

 • होय : 28.4 टक्के
 • नाही : 63.6 टक्के
 • माहिती नाही : 8 टक्के