आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकल्याण डोबिवली मनपात मनसेला मोठा हादरा बसला आहे. मनसेच्या 2 माजी नगरसेवकांसह काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी मनसेला सोडचिठ्ठ देत आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंच्या वर्षा या निवासस्थानी आज त्यांचा प्रवेश सोहळा पार पडलाय. शिवसेना नेते एकनाथ शिंदे पिता - पुत्राने कल्याणमध्ये मनसेला खिंडार पाडले आहे. आगामी मनपाच्या द़ष्टीने सर्वच राजकीय पक्षाने संघटनात्मक बांधणीला सुरूवात केली आहे.
विकासासाठी नगरसेवक शिवसेनेत - पालकमंत्री
आपल्या परिसराचा विकास करायचा असेल तर तो केवळ शिवसेनेच्या मदतीने होऊ शकतो, असा विश्वास मनसेच्या नगरसेवकांना होता. त्यांना विकासासाठी कोणताही निधी कमी पडणार नाही असे सांगत हे फोडाफोडीचे नव्हे तर विकासाचे राजकारण असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
आगामी काळात मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे नाशिक आणि औरंगाबादसह 15 मनपाच्या निवडणूका आहेत. यावेळी त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या दृष्टीने सर्व पक्ष कामाला लागले आहेत. मनसेच्या एकमेव आमदाराच्या मतदारसंघात शिवसेनेने दिलेला झटका मनसेसाठी खूप मोठा मानला जात आहे.
कुणाचा प्रवेश सोहळा?
घारीवली, काटई, ऊसरघर परिसरातील मनसेच्या माजी नगरसेविका पूजा गजानान पाटील, मनसे तालुका प्रमुखव कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सदस्य गजानान पाटील आणि माजी नगरसेवक तसेच मनसेचे जिल्हा सचिव प्रकाश माने यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत वर्षा येथे पक्ष प्रवेश पार पडला आहे.
विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांचाही रामराम
मनसेच्या विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्यासह त्यांचे अनेक पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासोबतच राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडून परिसीमनाचा घेतलेला अधिकार रद्द ठरवला आहे. यामुळे आता निवडणूक आयोगाला निवडणूक जाहीर करावी लागणार आहे. कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे ही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे हे स्पष्ट झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.