आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर:म्हणाले- शरद पवारांना सारा महाराष्ट्र ओळखतो, राज यांचे आरोप धादांत खोटे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेले आरोप हे धादांत खोटे आहेत. शरद पवारांना सारा महाराष्ट्र ओळखतो. त्यांनी कायम शाहू, फुले यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचे काम केले आहे, असे म्हणत राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी मनसे प्रमुख यांच्या टीकेला आणि आरोपांना जोरदार उत्तर दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच जातीयवाद सुरु झाला. राजकारणासाठी शरद पवार यांच्याकडूनच जातीयवादाचा वापर होतो, अशी टीका केली होती.

अजित पवार पुढे म्हणाले की, बातम्या होतात म्हणून राज ठाकरे हे शरद पवारांवर टीका करतात. हेच राज ठाकरेंनी पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा ते काय बोलत होते. असे दुटप्पी वागणे बरे नाही. शरद पवारांना संपुर्ण महाराष्ट्र 55 वर्षांपासून ओळखतो. राज ठाकरेंनी अशा प्रकारचे आरोप करणे हे हास्यपद आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळण्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कुणाच्या मनात काय यावं हा त्यांचा अधिकार आहे. उद्धव ठाकरेंच्या मनात तसे आले असेल म्हणून ते तसे बोलले असतील. उद्या कुणालाही मुख्यमंत्री करायचे म्हटले. पुरुषाला करा किंवा महिलेला करा नाहीतर कुणालाही करा. 145 हा बहुमताचा आकडा आहे. ज्यांच्याकडे हा आकडा असेल त्यांचा मुख्यमंत्री होईल.

हरीश साळवे यांची नेमणूक करावी

कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर बोलताना अजित पवार म्हणाले की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक राज्याची बाजू मांडण्यासाठी त्यांनी विख्यात वकील मुकुल रोहतगी यांना नेमले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील प्रख्यात वकील हरीश साळवे यांची तातडीने महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी नेमणूक करावी. सर्वोच्च न्यायालायातील नावाजलेलया पहिल्या पाचमध्ये त्यांचे नाव आहे. त्यामुळे आपल्या राज्याच्यावतीने त्यांना खटला लढण्यास सांगावे.

राज ठाकरेंचा शरद पवारांवर आरोप

मुस्लिम मते दूर जातील, या भीतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कधीही जाहीर भाषणांत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. केवळ शाहु-फुले-आंबेडकरांचेच नाव घेतात, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्राला मिळू शकतील महिला मुख्यमंत्री:उद्धव ठाकरेंच्या संकेतांचा अर्थ काय?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळण्याची चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या या विधानामुळे सुरु झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, जर समीकरणे जुळली तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोणत्या महिला नेत्यांची नावे आघाडीवर असू शकतात? सर्वात आधी पाहूयात नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे... संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बातम्या आणखी आहेत...