आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबागेश्वर बाबा (पंडित धीरेंद्र शास्त्री) यांच्या विरोधात मनसे नेत्यांनीही आक्रमकपणे विरोध सुरू केला आहे. मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी मंगळवारी कांदिवली (पूर्व) ठाकूर विलेजतील साई मंदिरात साईबाबांची आरती करून बागेश्वर बाबांचा निषेध केला. कदम म्हणाले की, धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास आगामी काळात मनसे कार्यकर्ते मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करतील. धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रातील एक ना एक संतांच्या विरोधात सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. संवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी ते अशा खालच्या पातळीवरील कृत्यांचा अवलंब करत आहेत. ज्याला माफ करता येत नाही.
युवासेना नेत्याची वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेना (ठाकरे गट) युवासेना नेते राहुल कानल यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात बागेश्वर बाबांविरोधात लेखी तक्रार केली आहे. ‘साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही.’ धीरेंद्र शास्त्री यांच्या या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप कानल यांनी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.