आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईच्या चाकरमान्यांसाठी मनसे मैदानात:मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी, पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडेंनी केला लोकलने प्रवास

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनसेने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती.

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. आता राज्यातील बऱ्याच गोष्टी पूर्वपदावर येत आहे. मात्र रेल्वे सेवा अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहे. त्यांच्यासाठीच आता मनसे मैदानात उतरली आहे. मनसेने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. यानंतर आज मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलने प्रवास करून आंदोलन केले.

मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेन सविनय कायदेभंग आंदोलन केले. रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे, सरचिटणीस गजानन काळे, अतुल भगत यांच्यासह मनसे नेत्यांनी लोकल ट्रेनने प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान ठाणे स्टेशनवर अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ठिक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात असल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...