आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मनसे नेत्यांवर कारवाई:मनसेच्या संदीप देशपांडेंसह पक्षाच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक, सवियनक कायदेभंग करत केला होता लोकलने प्रवास

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वे आणि कोविड संदर्भात नियम मोडल्यामुळे मनसैनिकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. दरम्यान रेल्वेसेवा ही बंद आहे. मुंबईची लोकल सुरू करण्याची यावी अशी मागणी मनसेने लावून धरली आहे. सोमवारी मनसेच्या नेत्यांना सवियनक कायदेभंग करत लोकलने प्रवास केला होता. या आंदोलनानंतर आता मनसेचे सरचिटनिस संदीप देशपांडेंना अटक करण्यात आली आहे. त्यांसह तीन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.

चाकरमान्यांचे हाल पाहून मनसेने काल सवियन कायदेभंग आंदोलन केले होते. यावेळी मनसेच्या नेत्यांनी लोकलने प्रवास केला. रेल्वे आणि कोविड संदर्भात नियम मोडल्यामुळे मनसैनिकांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51, 52 यासोबतच महाराष्ट्र कोविड उपाययोजना 2019 च्या कलम 11, तसेच भारतीय रेल्वे अधिनियम 147, 153, 156 अंतर्गत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

देशात कोरोनाचा शिरकाव झाला आणि खबरदारी म्हणून सरकारने सर्वच रेल्वे सेवा बंद केली होती. संपूर्ण देश लॉकडाऊन होता. मात्र आता अनलॉक सुरू झाले आहे. संपूर्ण कामकाज हे हळुहळू पुर्वपदावर येत आहे. सामान्य जनतेचे कामं सुरू झाले आहे. अशाच लोकल सुरू नसल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे लोकल लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मनसेची मागणी आहे.