आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवयी बदला:शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आता मोबाइल वापराची आचारसंहिता! कार्यालयात शक्यतो लँडलाइन वापराच्या सूचना

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयात परिधान करावयाच्या वेशभूषेबाबत मध्यंतरी केलेल्या मार्गदर्शक सूचना वादग्रस्त ठरल्या होत्या. आता त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी भ्रमणध्वनी (मोबाइल) वापराबाबत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी जारी केला आहे.

राज्य शासनाचे सुमारे १ लाख २० हजार कर्मचारी, अधिकारी आहेत. त्यांच्यासाठी आता भ्रमणध्वनी (मोबाइल) आचारसंहिता लागू झाली आहे. शासकीय कार्यालयात शक्यतो लँडलाइनचा वापर करावा, गरज भासली तरच मोबाइलचा वापर करावा, मोबाइलवर सौजन्यपूर्वक बोलावे, वाद घालू नये, अशा प्रकारच्या सूचना यात करण्यात आल्या आहेत.

मोबाइलचा वापर करताना शक्यतो लघुसंदेशचा (टेक्स्ट मेसेज) वापर करावा, लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ यांच्या आलेल्या दूरध्वनींना त्वरित उत्तरे द्यावीत, समाज माध्यमांचा वापर करत असताना वेळ आणि भाषा याचा तारतम्याने वापर करावा, असे या आचारसंहितेत नमूद आहे.

समाजमाध्यमांवर वेळ, भाषेचे तारतम्य बाळगा
वैयक्तिक कॉल असेल तर?

वैयक्तिक काॅल असतील तेव्हा कार्यालयाच्या बाहेर जाऊन घ्यावे लागतील.

शासकीय दौऱ्यावर असाल तर?
कार्यालयीन कामांसाठी कर्मचारी दौऱ्यावर असेल तर मात्र मोबाइल बंद ठेवता येणार नाही.

अन् सायलेंट मोड! वरिष्ठांच्या कक्षात मोबाइल सायलेंट मोडवर ठेवावेत, बैठकीत किवा वरिष्ठांच्या कक्षात मेसेज पाहणे टाळावे, असे यामध्ये बजावण्यात आलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...