आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भांडाफोड:मुंबईमध्ये टीव्ही अभिनेत्रींकडून वेश्यावृत्ती करुन घेणारी मॉडेल अटकेत, एका डीलसाठी घेतला जात होता 2 लाखांपेक्षा जास्त चार्ज

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमुळे वेश्या व्यवसायात झाली सामिल

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सेलने एका 32 वर्षीय मॉडेलला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक केली आहे. मॉडेलची ओळख ईशा खान म्हणून झाली आहे. तपासात असे समोर आले आहे की ही मॉडेल एका रॅकेटचा भाग होती ज्यात काही टीव्ही स्टार्सही सहभागी होते. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी काही अटक होऊ शकतात.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी जुहू येथील एका आलिशान हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आला, त्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. छाप्यादरम्यान, एक टीव्ही अभिनेता आणि मॉडेल तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. हे दोघे एका सुप्रसिद्ध मनोरंजन वाहिनीमध्ये काम करत होते. तसेच, एका साबणाच्या जाहिरातीमध्ये देखील दिसले होते.

गेली अनेक वर्षे हे रॅकेट सुरू होते
सीनियर इंस्पेक्टर मनीष श्रीधनकर म्हणाले की, महिला दलाल ईशा खानने सांगितले आहे की ती गेली अनेक वर्षे हे सेक्स रॅकेट चालवत होती. जेव्हा कोणी डीसीपी दत्ता नलावडे यांना ईशा खानबद्दल माहिती दिली, तेव्हा त्यांनी आपल्या टीमला सतर्क केले.

अशी केली मॉडेलला अटक
त्यानंतर युनिट 7 च्या अधिकाऱ्यांनी आरोपी मॉडेलकडे बनावट ग्राहक पाठवले होते, त्याच्याकडून 4 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ईशा खानने बनावट ग्राहकासोबत दोन मुलींसाठी दोन तासांसाठी एक करार केला आणि या दोन लाख रुपयांमध्ये ईशा खानला 50 हजार रुपये देण्याविषयी बोलली, तर ज्या दोन मुली निवडल्या गेल्या, ग्राहकांकडून मिळालेल्या रकमेतून, दीड लाख रुपये त्यांना ईशा खान द्वारे दिले असते.

लॉकडाऊनमुळे वेश्या व्यवसायात झाली सामिल
मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्रीने सांगितले की कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे जाहिराती आणि टीव्ही सीरियलचे शूटिंग थांबले होते, पैशांची कमतरता होती, म्हणून ती या व्यवसायात आली.

बातम्या आणखी आहेत...