आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचार सभा रद्द केल्या आहेत. पीएम मोदी आज पंजाबच्या फिरोजपूरमध्ये एका सभेला संबोधित करणार होते. ती सभा सुद्धा आता रद्द करण्यात आली.
खराब वातावरणामुळे मोदी बठिंडा विमानतळावरून फिरोजपूर येथे रस्त्याच्या मार्गे पोहोचले. यानंतरच त्यांची सभा रद्द केली जात असल्याची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, 9 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील राजधानीमध्ये त्यांची एक सभा होती, ती देखील रद्द करण्यात आली आहे. पंजाबमध्ये खराब वातावरणाचे कारण दिले जात असले तरी लखनऊ येथे कोरोनाच्या चिंतेमुळे त्यांनी सभा रद्द केल्याची चर्चा आहे.
खराब वातावरणामुळे विमान रद्द, कारने प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला बठिंडा येथील हवाई दलाचे स्टेशन भिसियाना येथे पोहोचले. पंतप्रधान फिरोजपूरला विमानानेच जाणार होते. परंतु, खराब वातावरणामुळे त्यांना कारने फिरोजपूरला जावे लागले. फिरोजपूरमध्ये हुसैनीवाला बॉर्डर पोहोचल्यानंतर त्यांनी शहीद भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आदरांजली वाहिली. यानंतर 5 प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
सुरक्षेत कसूर, 15 मिनिटे थांबवला मोदींचा ताफा
तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदी फिरोजपूरला येत असताना सुरक्षेत कसूर दिसून आला. यामुळे मोदींचा ताफा 15-20 मिनिटांसाठी थांबवण्यात आला. यानंतर पंतप्रधानांचे गार्ड बाहेर पडले आणि सुरक्षेची पाहणी केली. यानंतरच मोदींचा ताफा माघारी गेला आणि सभा रद्द करावी लागली असेही सांगितले जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात पंजाब सरकारकडून रिपोर्ट मागितला आहे. तर भाजपने यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.
विशेष म्हणजे, फिरोजपूरच्या याच सभेला जाणाऱ्या इतर भाजप कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त सुद्धा आहे. यावेळी पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी लाठीमार सुद्धा करावा लागला.
दरम्यान, किसान एकता मोर्चाने ट्विट करून मोदींची प्रचार सभा आपल्यामुळेच रद्द झाली असा दावा केला आहे.
सीमावर्ती फिरोजपूरमध्ये भाजपचा प्रभाव
पंजाबच्या ज्या फिरोजपूर भागात पंतप्रधान सभा घेणार होते त्या ठिकाणी भाजप समर्थकांची संख्या अधिक आहे. पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या या भागात 3 पैकी 2 आमदार नेहमीच भाजपचे असतात. फिरोजपूर शहर, अबोहर, फाझिल्का येथे भाजपचा किल्ला मजबूत आहे. फिरोजपूर जिल्ह्यातील गुरुहरसहाय येथे आमदार राणा गुरमीत सोढी यांनी नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच याच वर्षी अकाली दलाचे नेते गुरतेज सिंग यांनी भाजपचे कमळ हातात घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.