आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी शर्टवरून उठवलेल्या वादंगावर काँग्रेस उत्तर:मोदींचा 10 लाखांचा सूट ओके राहुल गांधींचा टी शर्ट नॉट ओके

ठाणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधींच्या टी शर्टवरून भाजपने उठवलेल्या वादंगावर आता काँग्रेसनेही सडेतोड उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या वतीने कल्याणमध्ये भाजपच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमधून भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दहा लाखांचा सूट चालतो, अनुराग ठाकूर यांच्या मुलाचा बरबरीचा टी शर्ट चालतो, मग राहुल गांधींचा टी शर्ट डोळ्यात का खूपतो? असा सवाल भाजपला करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी महागड्या ब्रॅन्डचा टी शर्ट घातला. त्याची किंमत ४१ हजार होती, असा दावा भाजपने केला. काही नेत्यांनी राहुल यांना ट्रोलही केले. मात्र हाच मुद्दा पकडत काँग्रेसनेही भाजपवर जोरदार निशाणा साधत कल्याणमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

या बॅनरमध्ये म्हटले आहे की, वाढती महागाई, बेरोजगारी, वाढणारे पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर, महिलांची असुरक्षिता, शेतकऱ्यांचे प्रश्न, कोलमडलेली अर्थव्यवस्था असे अनेक मोठे प्रश्न देशासमोर सध्या आहेत. असे अनेक प्रश्न असताना जनतेची दिशाभूल करणाऱ्या केंद्र सरकाराचा जाहीर निषेध.

बातम्या आणखी आहेत...