आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mohan Bhagwat Said Castes Were Not Created By God But By Brahmins, In The Country Conscience And Consciousness Are All Equal, Only Opinions Are Different.

मोहन भागवत म्‍हणाले:जाती ईश्वराने नव्हे, ब्राह्मणांनी निर्माण केल्या, देशात विवेक-चेतना सर्व समान, केवळ मते वेगवेगळी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाती ईश्वराने बनवल्या नाहीत, तर त्या ब्राह्मणांनी निर्माण केल्या आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केले. ते म्हणाले, माझ्यासाठी सर्व समान आहेत. माझ्यात कोणतीच जात किंवा धर्म नाही, असे ईश्वराने सांगितले आहे. मात्र, पंडितांनी केलेली वर्गवारी चुकीची होती.

भागवत पुढे म्हणाले, देशात विवेक, चेतना सर्व समान आहे. त्यात कोणताच फरक नाही. केवळ मते वेगवेगळी आहेत. याचाच फायदा घेत आमच्या देशावर आक्रमणे झाली आणि बाहेरून आलेल्या लोकांनी फायदा उचलला, असे सांगून त्यांनी हिंदू समाज देशातून नष्ट होण्याची भीती दिसत आहे का, असा सवाल केला. मात्र हे तुम्हाला कोणताच ब्राह्मण सांगू शकणार नाही. ते तुम्हाला समजून घ्यावे लागेल. आमच्या उपजीविकेचा अर्थ समाजाप्रतिही जबाबदारी असते. प्रत्येक काम समाजासाठी असेल तर कोणी उच्च, नीच किंवा वेगळा कसा असू शकतो, असा सवाल सरसंघचालकांनी केला.

बातम्या आणखी आहेत...