आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Mohan Delkar Suicide Update | Dadra And Nagar Haveli MP Mohan Delkar Found Dead At Mumbai Hotel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉटेलमध्ये आढळला खासदाराचा मृतदेह:मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांना एक सुसाइड नोटही सापडली आहे

दादरा आणि नगर-हवेलीचे खासदार मोहन डेलकर दक्षिण मुंबईमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांचा मृतदेह मरीन ड्राइव्हवरील हॉटेल सी ग्रीनमध्ये आढळला. पोलिसांना त्यांच्या रुममध्ये एक गुजराती भाषेत लिहीलेली सुसाइड नोट सापडली आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवला आहे.

डेलकर यांचे वय 58 वर्षे होते. ते 1989 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत ते 7 वेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. त्यांनी 1989 पासून 2004 पर्यंत सलग 6 वेळा लोकसभेत विजय मिळवला. डेलकर यांच्या पश्चात पत्नी कलाबेन डेलकर, दोन मुले अभिनव आणि दिविता आहेत.

भाजप, काँग्रेस आणि अपक्ष खासदार झाले

मोहन डेलकर यांनी भाजप, काँग्रेस आणि अपक्ष निवडणूक लढवल्या आहेत. त्यांनी 1991 आणि 1996 मध्ये काँग्रेसमधून निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर 1998 च्या निवडणुकीत भाजपकडून विजय मिळवला. 1999 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजयी झाले. 2004 मध्ये त्यांनी भारत नवशक्ति पार्टी नावाने पक्ष स्थापन केला आणि परत एकदा विजयी झाले. 2019 मध्येही अपक्ष राहून विजयी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...