आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुलना:सुषमा अंधारे-राखी सावंत दोघी बहिणी, एक राजकारणात तर दुसरी सिनेमात सनसनाटी निर्माण करतात; मोहित कंबोज यांची टीका

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी आहेत, असे म्हणत भाजप नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांची थेट राखी सावंतशी तुलना केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वार-पलटवार रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोघी बहिणी आहेत. एक महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी महाराष्ट्राच्या सिनेमात, या दोघीच एकमेकींच्या स्पर्धक आहेत. दोघींपैकी कोण जास्त सनसनाटी करणार यातच दोघींची स्पर्धा रंगते, अशी टीका करत त्यांनी नव्या वादाला सुरुवात केली आहे.

मोहित कंबोजांनी घेतला समाचार

मोहित कंबोज यांचे ट्विट.
मोहित कंबोज यांचे ट्विट.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झुकेंगा नही साला घुसेंगा' असे म्हणत उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले होते. "झुकेगा नही घुसेगा साला" हा डायलॉग भारीच होता. पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली आणि याचा तुम्हाला 7 वर्षे पत्ता लागला नाही असा टोला अंधारे यांनी लगावला होता. आता देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या या टीकेचा मोहित कंबोज यांनी समाचार घेतला आहे.

ठाण्याच्या मोर्चातही टीका

महिला जर गरोदर नसेल तर तिच्या पोटात लात मारणे योग्य आहे का?, असा सवाल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काल उपस्थित केला होता. अंधारे म्हणाल्या, जर पोलिस अधिकारी भेटायला तयार नाही, गृहमंत्र्यांना काहीच दिसत नाही तर मुख्यमंत्र्यांना सुरत गुवाहटी, गोवा शिवाय काही महत्त्वाचे नाही. पोलिसांनी तक्रार दाखल न केल्याने आम्ही मोर्चा काढला.