आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, कंबोज रात्री साडेतीन वाजता बारमध्ये बेधुंद अवस्थेत मुलींबरोबर नाचत होते, याचा तपास करावा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मोहित कंबोज यांच्यावर सर्व बाजूंनी होत असेल्या टीकेवर त्यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे.
माझ्याविरुद्धचे षडयंत्र लवकरच सत्यासह उघड करणार, असा दावा करत मोहित कंबोज यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. डुकरांशी कधीही कुस्ती करू नका, असा टोलाही त्यांनी संजय राऊतांना लगावला आहे. मात्र कंबोज यांच्याविरोधात वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आज संभाजी ब्रिग्रेड मोहित कंबोज यांच्याविरोधात आंदोलन करणार आहे.
सचिन कांबळे यांचा व्हिडिओ
संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा व्हिडिओ टविट केला आहे. यात सचिन कांबळे म्हणताय की, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज हे रात्री साडेतीन वाजता लिंक रोड खार पश्चिम येथील रेडिओ बार येथे मुलींना घेऊन नाचत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संजय राऊतांनी केलेल्या या आरोपांनंतर वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मोहित कंबोज यांनी काल ट्विट करत लवकरच पलटवार करणार असल्याचे सांगितले आहे. मोहित कंबोज यांनी ट्विट करत म्हटले आहे की, प्रत्येक गोष्टीला उत्तराची गरज नसते. डुकरांशी कधीही कुस्ती करू नका, तुम्ही दोघेही गलिच्छ व्हाल आणि डुक्कराला ते आवडेल. मी माझे उत्तर योग्य वेळी आणि माझ्या शैलीत देईन. बनावट कथा आणि अफवा टिकणार नाहीत. यामागे काय षडयंत्र रचले गेले आहे ते लवकरच सत्यासह उघड होईल.
राऊतांचे टविट काय?
पहाटे 3.30 वाजता बार सुरू असल्याचे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तर महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शेवटपर्यंत पहा. पोलिस हतबल आहेत..हे तर काहीच नाही.. कायद्याचे धिंडवडे काढणारे फुटेज मी पोलिस आयुक्तांना पाठवत आहे. मी वाट पाहतोय पोलिस काय कारवाई करत आहेत. हिंदुत्व नशेच्या व्यापारात अडकले आहे का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला असून या ट्विटमध्येही गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, मुंबई पोलिसांना टॅग केले आहे.
हेही वाचा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.