आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पडेगा.'' अशे विधान भाजप नेते मोहित कंबोज यांनी आज केले. ज्यावेळी संजय राऊत यांच्या जामीन निश्चित झाला त्यानंतर कंबोज यांनी साडेपाचच्या सुमारास हे ट्विट करून हा इशारा दिला. हा इशारा संजय राऊत यांना दिल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे आपण लढत राहणार असून अनेक प्रहार झाले तरीही शिवसेना खचली नाही. मी लढत राहणार असा इशाराही राऊतांनी विरोधकांना दिला.
मोहित कंबोजही सज्ज
शिवसेनेवर एकदाही टीकेची संधी न सोडणारे मोहित कंबोज यांनी आज नाव न घेता पुन्हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ''लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पडेगा'' असा मजकूर लिहून आपणही लढण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी सुचक ट्विट केले आहे.
राऊत- कंबोज वाद
संजय राऊत यांचा फोटो मार्फ करून त्यांना महिलेच्या वेशात दाखवण्यात आले होते. पहचान कौन? असा मजकूरही या ट्वीटवर मोहित कंबोज यांनी लिहिला होता. मोहित कंबोज यांच्याशी संजय राऊत यांचा वाद सर्वश्रूत असून किरीट सोमय्या - राऊत वाद वाढल्यानंतर कंबोज यांची गाडी फोडण्यात आली होती. त्यानंतर दोघांत शाब्दीक वाॅरही रंगले होते.
एकमेकांवर टीकास्त्र
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली होती. तपास यंत्रणा आपले काम करत आहेत. 650 लोकांचे घर तुम्ही हिरावले. मसलपॉवर वापरुन तुम्ही 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. संजय राऊत यांचे राजकारण नेहमी खालच्या दर्जाचे राहिले आहे. संजय राऊत आणि नवाब मलिक हे डबल आयडेंटीटी असलेली माणसे आहेत. मसल पॉवर, मॅन पॉवरचा वापर करत त्यांनी जमिनी हडपल्या, घरे हडपली. संजय राऊत हा खूप शातीर माणूस आहे.
राऊतांनी केला होता आरोप
फेब्रूवारी 2022 मध्ये पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी आरोप केला होता की, मोहीत कंबोज हा देवेंद्र फडणवीस यांचा फ्रंटमॅन आहे. फडणवीस यांना तो डूबवणार आहे. पत्राचाळ घोटाळा करणारा आणि पीएमसी बँक बुडवणारा मोहीत कंबोज आहे. मोहित कंबोज यांचे पत्राचाळ येथे लक्झर कंस्ट्रक्शन सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.