आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँड्रिंग प्रकरण:अनिल देशमुख यांच्या दोन्ही मुलांसह इतर आरोपींना हजर राहण्याचे आदेश

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, त्यांची दोन मुले आणि इतर आरोपींना ५ एप्रिल रोजी हजर होण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल खटल्याची सुनावणी करणाऱ्या या कोर्टाने गेल्या सुनावणीत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्राची स्वत:हून दखल घेतली होती. त्यानुसार, शुक्रवारी कोर्टाने देशमुख, त्यांची मुले ऋषिकेश, साहिल आणि काही कंपन्यांसह इतर ९ जणांना ५ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले.

२ नोव्हेंबरला अटक झाल्यानंतर अनिल देशमुख ईडीच्या ताब्यात असून गृहमंत्री असताना पदाचा दुरुपयोग, बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेच्या माध्यमातून ४.७ कोटींची वसुली, नागपूरस्थित श्री साई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पैशाचे घोटाळे असे आरोप अनिल देशमुख यांच्यावर आहेत.

बातम्या आणखी आहेत...