आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Money Laundering Case: Enforcement Directorate Files Chargesheet Against PA And PS Of Anil Deshmukh, Accused Of Being Involved In The Business Of Recovery; News And Live Updates

मनी लाँड्रिंग प्रकरण:इडीने अनिल देशमुख यांच्या पीए आणि पीएसविरुद्ध दाखल केली चार्जशीट; वसुलीच्या व्यवसायात गुंतल्याचा आरोप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडीच्या हाती अशाप्रकारे आले वसुली प्रकरण

100 कोटींच्या वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देशमुख यांच्या खाजगी सचिव आणि सहाय्यकविरोधात चार्जशीट दाखल केली आहे. दरम्यान, वसुलीचे पैसे जमा करुन त्या पैशांचे काळ्यामधून पांढऱ्यामध्ये रुपांतरित केल्याचा आरोप ईडीने केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने 12 तासांच्या कठोर चौकशीनंतर दोघांना 26 जून रोजी अटक केली होती. अनिल देशमुख राज्याचे गुहमंत्री असताना संजीव पलांडे (खाजगी सचिव) कुंदन शिंदे (खाजगी सहाय्यक) होते.

अंमलबजावणी संचालनालय मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करीत आहे. दरम्यान, ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी आतापर्यंत 5 वेळ समन्स पाठवले आहे. परंतु, अनिल देशमुख एकाही वेळेस चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे त्यांच्या जागी चौकशीसाठी हजर राहिले आहेत. ईडीने अनिल देशमुख यांच्या 12 ठिकाणांवर छापेमारी केली असून यामध्ये 4.2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. विशेष म्हणजे देशमुख यांना याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडून वारंवार मोठा धक्का मिळाला आहे.

शिंदे आणि पलांडेवर हे आहेत आरोप
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर केला. दरम्यान, देशमुख यांनी बडतर्फ सचिन वाझेच्या माध्यमातून मुंबईतील अनेक बार आणि पबमधून 4.7 कोटी रुपये गोळा केले असल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. वसुलीचे पैसे गोळा करण्याचे काम संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्यामार्फत करण्यात येत असल्याचे आरोपपत्रात उल्लेख आहे. सचिन वाझे सध्या अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तळोजा कारागृहात आहे. एनआयए याप्रकरणी त्यांची चौकशी करीत आहे. विशेष म्हणजे सचिन वाझे यांचे दोन जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहे.

ईडीच्या हाती अशाप्रकारे आले वसुली प्रकरण
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महिन्याला 100 कोटी रुपये वसुली करण्याचा आरोप केला होता. दरम्यान, हे प्रकरण उच्च न्यायालयात आल्यानंतर सीबीआयला सोपवण्यात आले. सीबीआयने याप्रकरणी हस्तक्षेप करत अनिल देशमुख यांच्यासह अनेक लोकांवर मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...