आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीची 'पिडा':शिवसेना खासदार भावना गवळींच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून पुन्हा बजावण्यात आला समन्स

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 तारखेला ईडी कार्यालयात त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

शिवसेना खासदार भावना गवळी यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी त्यांची चौकशी केली जात आहे. 20 दिवसांपूर्वी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी भावना गवळी यांना समन्स बजावण्यात आला होता. तसेच त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांची देखील ईडीकडून अटक करण्यात आली होती. यानंतर भावना गवळींना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला आहे. येत्या 20 तारखेला ईडी कार्यालयात त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

या प्रकरणात सुरू आहे चौकशी?
वाशीम जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक आडकाठी आणत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर गवळी यांनी 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. गवळींनी 55 कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना 25 लाख रुपयात घेतला आहे. सन 2019 मध्ये रिसोड येथील जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्यालयातून 7 कोटी रुपये चोरून नेल्याची तक्रार गवळी यांनी केली होती. 7 जुलै 2019 रोजीच्या चोरीची तक्रार 12 मे 2020 रोजी करण्यात आली.

दरम्यान, 10 महिने उशिरा तक्रार देण्याचे कारण काय? त्या कार्यालयात 7 कोटी कुठून आले? असे सवाल सोमय्या यांनी केले होते. या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री, सीबीआय, ईडी, स्टेट बँक, नॅशनल को-ऑप. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व अन्य ठिकाणी तक्रारी केल्या आहेत. मुंबई येथील ईडीची पथके रिसोड येथे 30 ऑगस्ट रोजी सकाळी दाखल झाली. भावना गवळींच्या रिसोड अर्बन सहकारी पतसंस्था, आयुर्वेद महाविद्यालय, भावना पब्लिक स्कूल, डी.फॉर्म महाविद्यालय, पुंडलिकराव गवळी महाविद्यालय, शिरपूर जैन या संस्थांमध्ये धाडी टाकण्यात आल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...