आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँडरिंगचे प्रकरण:ईडी आज नोंदवणार सचिन वाझेचा जबाब, वाझे सध्या मुंबईच्या तळोजा तुरुंगात कैदेत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील मनी लाँडरिंग प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाचे (ईडी) पथक मुंबई पोलिस विभागातील माजी सहायक निरीक्षक सचिन वाझेची शनिवारी चौकशी करण्याची शक्यता आहे.

सचिन वाझे सध्या मुंबईच्या तळोजा तुरुंगात कैदेत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन उभे केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याच प्रकरणाशी संबंधित व्यावसायिक मनसुख हिरेनची हत्या केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. अँटिलिया प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) हाती आहे, तर या प्रकरणानंतरच भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या घेऱ्यात अडकलेल्या देशमुख प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि ईडीकडे आहे. ईडी काळ्या पैशाशी संबंधित असलेल्या आरोपांचा तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...