आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रात लॉकडाउन लागू झाल्यापासून बंद असलेली देशातील पहिली मुंबई मोनो रेल्वे सेवा 6 महीन्यानंतर सुरू होत आहे. मोनो रेल्वे आज (दि.18 ऑक्टोबर)पासून सुरू होत आहे. सध्या याची फक्त चेंबूर-वडाळा-जेकब सर्कल ट्रॅकवर फेरी चालेल. या मोनो रेल्वेला परत सुरू करण्यापूर्वी सरकारने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर एक एसओपी जारी केली आहे. तसेच, प्रवाशांसाठी 'नो मास्क-नो एंट्री'चे स्लोगन दिले आहे.
मोनो रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी दिलेल्या गाइडलाइन्स
फेब्रुवारी 2014 पासून सुरू झाली होती मोनो रेल्वे
एमएमआरडीएने फेब्रुवारी 2014 मध्ये देशातील पहिली मोनो रेल्वे सेवा चेंबूर आणि वडाळा डेपोदरम्यान सुरू केली होती. तेव्हा मोनो रेल्वे 8.8 किलोमीटरचा प्रवास करायची. दुसऱ्या टप्प्यात याला 20 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आले. या रुटवर वडाळा, भक्ती पार्क, मैसूर कॉलोनी, बीपीसीएल, फर्टिलाइजर टाउनशिप, वीएनपी-आरसी मार्ग जंक्शन आणि चेंबूर हे 7 स्टेशन आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.