आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्टेंबर महिन्यात पावसाचे रौद्ररूप:शेवटच्या टप्प्यात 109 % पावसाचा अंदाज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या वर्षातील मान्सून हंगामाच्या अखेरमध्ये म्हणजेच सप्टेंबर महिन्यात देशभरात 109 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सप्टेंबरमध्ये सरासरी 167.9 मिमी पाऊस पडतो. तर यंदा मान्सूनच्या तीन महिन्यांत देशात सरासरीपेक्षा सहा टक्के जास्त पाऊस झाला आहे.

सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये राज्याच्या सर्वच भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यातही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांत मुसळधारांची शक्यता आहे.

हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला. जम्मू, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर आंध्र प्रदेश, किनारी कर्नाटक, उत्तर केरळ, दक्षिण किनारपट्टी तामिळनाडू, त्रिपुरा आणि अंदमान निकोबार बेटे या महिन्यात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे हवामान खात्याने सांगितले.

15 सप्टेंबरपर्यंत परतीची चिन्हे नाही
पावसाच्या परतीचा प्रवासाबाबात हवामान खात्याने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत त्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. पावसाचा परतीचा प्रवास हा साधारणतः 1 सप्टेंबरपर्यंत टप्प्यावर असतो उत्तर-पश्चिम राजस्थानमधून तो माघार घेऊ लागतो. आतापर्यंतच्या तारखांनुसार, मान्सून साधारणपणे 17 सप्टेंबरपर्यंत वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करतो.

बातम्या आणखी आहेत...