आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Monsoon, Rain And Weather Forecast Today News And Updates 14 June 2021| Rain In Ratnagiri, Raigad Today With Relief In Mumbai; News And Live Updates

मॉन्सून ट्रॅकर:मुंबईतील मुसळधार पावसाला रविवारी ब्रेक, रत्नागिरी आणि रायगडमध्ये आज रेड अलर्ट - हवामान विभाग

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेड अलर्टच्या दरम्यान सकाळपासूनच महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे मुसळधार पाऊस सुरू आहे.

मान्सून गेल्या काही दिवसांपासून राज्यात दाखल झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाला रविवारी ब्रेक लागला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार असून त्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाणे, पुणे आणि इतर उपनगरांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईचा पवना तलाव ओसंडून वाहत आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईचा पवना तलाव ओसंडून वाहत आहे.

राज्यात गेल्या 24 तासांत कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला. येत्या दोन तीन दिवसांत मुंबईसह ठाणे, आलिबाग आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी इशारा दिला आहे. या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह, 30-40 किमी प्रति तास वेगाने हवा चालणार आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत.
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत.

मुंबईत 5 दिवसात 589.1 मिमीपेक्षा जास्त पाऊस
मुंबईत गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाला रविवारी ब्रेक लागला. 8 ते 12 जून दरम्यान मुंबईत 715.3 मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस सामान्यता 126.1 मिमी च्या तुलनेत 589.1 मिमी जास्त आहे. तर संपूर्ण महिन्यासाठी सामान्य पावसाचा आकडा 493.1 मिमी मानला जातो. अशा परिस्थितीत मुंबईत या महिन्याच्या अखेरीस सामान्य पावसापेक्षा जास्त पाऊस पडणार आहे.

बातम्या आणखी आहेत...