आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून ट्रॅकर:मुंबईत तिसऱ्या दिवशीही पाऊस सुरु, सखल भागात पाणी साचले, मध्यप्रदेशात 7 दिवसांपूर्वीच पोहोचला मान्सून

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस सुरु असून मान्सून आता मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पोहोचला आहे. मध्य प्रदेशात मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा 7 दिवस आधी झाले आहे. वायव्य दिशेने बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे ओडिशा आणि गंगालगतच्या पश्चिम बंगालच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने (IMD) येत्या 24 तासांत उत्तर प्रदेश, छत्तीसगडसह 20 राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.

या 18 राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट
ओडिशा, पश्चिम बंगाल, कोकण आणि गोवा, छत्तीसगड, तेलंगणा, दक्षिणपूर्व मध्य प्रदेश, सिक्किम, उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, मराठवाडा आणि विदर्भ, तामिळनाडू, रायलसीमा, लक्षद्वीप, दक्षिण गुजरात.

या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त पाऊस
गेल्या 24 तासांत मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमध्ये 75 मिमी, मुंबईच्या सांताक्रूझमध्ये 107 मिमी, कोकणातील डहाणूमध्ये 64 मिमी आणि आसामच्या सिलचरमध्ये 64 मिमी पाऊस पडला आहे.

पावसाने मुंबईतील परिस्थिती आणखी बिघडविली
शुक्रवारी मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आयएमडीने दिवसभर मुंबई व आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरवात झाली आहे.

मुंबईत या भागात पाऊस पडत आहे
मुंबईच्या कुलाबा परिसर, अंधेरी, सायन, माहीम, किंग सर्कल, हिंदमाता, दादर आणि परळ अशा अनेक भागात रस्ते व अंडरपासवर पूर आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता पाहता मरीन ड्राईव्हवर सकाळी 9 नंतर सामान्य नागरिकांना जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईप्रमाणेच नवी मुंबई आणि ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे.

गेल्या 24 तासांत मुंबईत 107.4 मिमी पाऊस झाला
'स्कायमेट' हवामान मंडळानुसार, जूनच्या पहिल्या दहा दिवसांत मुंबईत 426.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी सामान्य 89 मिमीपेक्षा 338 मिमी जास्त आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत (गुरुवारी सकाळी 8.30 ते शुक्रवार 8.30 पर्यन्त ) कुलाबामध्ये 23.4 मिमी आणि सांताक्रूझमध्ये 107.4 मिमी पाऊस झाला.

बातम्या आणखी आहेत...