आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस:ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत गदारोळ, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की; अध्यक्षकांचा माईकही ओढला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले असल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गदारोळ पाहायला मिळाला. अध्यक्षांच्या दालनाबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. 2017 साली हे प्रकरण सुरू झाले आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण 2019 पर्यंत काहीच केलेले नाही. 1 ऑगस्ट 2019 ला नीती आयोगाला तुम्हीच पत्र लिहिले आणि भारत सरकारकडे डेटा मागितला असल्याचा खुलासाही भुजबळांनी केला. यावेळी विरोधकांचा जोरदार गदारोळ सुरु झाला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यासोबतच अध्यक्षांचा माईकही ओढला.

ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरीकल डेटा उपलब्ध व्हावा यासाठी छगन भुजबळ यांनी ठराव मांडला. यावेळी भुजबळांनी फडणवीस सरकारच्या काळात केलेल्या पत्रव्यवहारच सभागृहात वाचून दाखवला. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मध्येच उठून बोलण्यास सुरुवात केली. 'इम्पेरीकल पॉलिटीकल रेफरन्स सर्वोच्च न्यायलायामध्ये सादर करावे लागेल तरच ओबीसी राजकीय आरक्षण टिकू शकेल. आता ठराव मांडून काहीच साध्य होऊ शकणार असल्याचे म्हटले.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर इंपेरिकल डेटा केंद्र सरकारने राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा असा ठराव राज्य सरकारने सभगृहामध्ये मांडला. या विरोधात विरोधक आक्रमक झाले. मागासवर्गीय आयोग नेमून तो डाटा राज्य सरकारने मिळवावा असं म्हणत विरोधकांनी घोषणाबाजी केली.

बातम्या आणखी आहेत...