आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस कडाडले:...मग तुम्हाला वडे तळायला बसवलेय का?, मोगलांना जमले नाही ते ठाकरे सरकारने करुन दाखवले; प्रतिविधानसभेमध्ये फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांना लुटले जात आहे

राज्यात 5 आणि 6 जुलैला विधीमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडत आहे. आज अधिवेसनाचा अखेरचा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाले. यात शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मोठा गोंधळामुळे भाजपच्या 12 आमचारांना निलंबितही करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ भाजपने आधी विधिमंडळ परिसरात प्रतिविधानसभा भरवली होती. यावेळी फडणवीसांनी ठाकरे सरकावर जोरदार निशाणा साधला आहे.

प्रतिविधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, 'कर्जमाफी, चक्रीवादळात मदत, पीक विमा, राज्याचे अर्थकारण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतील आरक्षण हे सर्व केंद्रा द्यावे. मेट्रोचे काम देखील थांबले आहे, ते सुद्धा केंद्र सरकारने करावे. 100 कोटीची वसुली कारवाई करणार फण रेमडेसिवीरसाठी केंद्र सरकार दोषी, ऑक्सिजन , ब्लॅक फंगससाठी केंद्र सरकार दोषी, लसीकरण केंद्र सरकार करणार, तुटवडा असेल तर केंद्र सरकार दोषी... जर सर्व गोष्टी केंद्र सरकारकडून गेल्या जात असतील तर मग तुम्हाला काय वडे तळायला बसवले आहे का? अशा संतप्त सवाल देवेंद्र पडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

मोगलांना जमले नाही ते ठाकरे सरकारने करुन दाखवले
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, 'सरकारने खासगी लोकांचे बियाणे हे विकले पाहिजे म्हणून महाबीजला बियाणांचे उत्पादन करू दिलेले नाही. शेतकऱ्यांना नागवण्याचेच काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे किती शाप घेणार असा सवालही फडणवीसांनी सरकारला केला. तसेच अमरावतीत दोन दिवसात सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. जे मोगलांना निजामाला इंग्रजांना जमलं नाही ते ठाकरे सरकारने करुन दाखवले आहे. तसेच विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. मोठा घोटाळा यात आहे. तीन वर्षांत ₹13,500 कोटींचा हा फायदा विमा कंपन्यांना होणार आहे'

बातम्या आणखी आहेत...