आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घटना घडली आहे. सोमवारी ठाण्यातील कलवामध्ये दरड कोसळल्यानंतर डोंगराचा ढिगारा एका घरावर कोसळला. ज्यामध्ये एका कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या ढिगाराखाली 7 लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मृतांमध्ये 3 मुले असून रवी किशन (12 वर्ष), सिमरन (10 वर्ष) आणि संध्या (3 वर्ष) अशी त्यांची नावे आहेत. या दुर्घटनेतून प्रिती आणि अचल यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तर प्रभू यादव (45 वर्ष) आणि विद्यावती (40 वर्ष) अशी इतर दोन मृतांची नावे आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरूच असून यात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबईत सलग दुसऱ्यादिवशी मोठी घटना
मुंबईत सतत सुरु असलेल्या पावसामुळे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या दोन भूस्खलनांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी 17 जणांचा चेंबूर भागात तर 5 जणांचा मृत्यू विक्रोळी येथे मृत्यू झाला. 16 लोकांना सुखरूप वाचवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पाच घरे कोसळली असून दोन घरांचा ढिगारा काढण्यात आला आहे. पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.