आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईत गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे वडाळा, सायन आणि गांधी मार्केटमधील रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे. मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बीएमसीने बसेसच्या मार्गात बदल केले आहे. तर दुसरीकडे हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सेवांनाही याचा जोरधार फटका बसला आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईच्या विमानतळावरील धावपट्टीवरदेखील पाणी साचले आहे. यामुळे येथील विमानांचे उड्डाण सुरु करण्यात आले की नाही याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
रेल्वेच्या वाहतुकींवर मोठा परिणाम
मध्य रेल्वे सीपीआरओच्या मते, या मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावरील अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे कुर्ला-विद्याविहारजवळ गाड्या 20 ते 25 मिनिटे उशीरा धावत आहे. स्लो मार्गावरील वाहतूक कुर्ला-विद्याविहार जलद मार्गाकडे वळवले आहे. हार्बर मार्गावरील गाड्या ही 20 ते 25 मिनटे उशीरा धावत आहे. तर दुसरीकडे ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूकीत कोणतीच अडचण नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
मुंबईत एका आठवड्यात 77 टक्के पाऊस
मुंबईत 1 जूनपासून तर आतापर्यंत 1291.8 मिमी पाऊस झाला आहे. हे सामान्यापेक्षा 48 टक्के जास्त आहे. गेल्या आठवड्यात मुंबई शहरात 302 मीमी पाऊस पडला असून तो सामान्यापेक्षा 77 टक्के जास्त आहे. याच पार्श्वभूमीवर बीएमसीने मुंबईतील पाणी साचत असलेल्या भागात नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.