कोरोना प्रतिबंधासाठी आणखी तपशिलात उपाययोजना करण्याची गरज : देवेंद्र फडणवीस

  • बाजार समित्यांमध्ये आरोग्य सुविधा पुरवण्याची नितांत गरज

दिव्य मराठी

Mar 25,2020 08:10:00 AM IST

मुंंबई - कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचे स्वागत आहे. पण काही बाबतीत आणखी तपशिलात जाऊन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवायचा असेल, बाजार समित्यांमध्ये आरोग्य सुविधा पुरवण्याची नितांत गरज आहे.


माथाडी कामगारांकडे ओळखपत्र आहेत. पण व्यापारी, वाहतूकदार आणि खरेदीदार हे बाजार समित्यांमध्ये येऊ शकतील, हे सुनिश्चित करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

X