आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबी समुद्रात 4 जहाज अडकले:दोन जहाजांवर अडकलेल्या 495 लोकांपर्यंत अद्याप मदत पोहोचलीच नाही, इतर दोन जहाजांमधून 215 जणांना वाचवण्यात यश

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसऱ्या एका अडकलेल्या जहाजातून 38 जणांना वाचवण्यात आले

तौक्ते चक्रीवादळानंतर मुंबईच्या समुद्रात भारताचे 4 जहाज अडकले आहेत. या जहाजांवर 710 लोकं अडकले असून, यातील 215 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मुंबईपासून 175 किमी अंतरावर हीरा फील्ड्सजवळ बार्ज P-305 वर रेस्क्यू मिशन सुरू आहे. या जहाजावर सर्वाधिक 273 लोकं अडकली आहेत, यातील 177 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

बार्ज P-305 चे बचावकार्य INS कोलकाता आणि INS कोच्ची करत आहेत. पुढील काही तासात सर्व लोकांना सुरक्षित काढले जाईल. या जहाजाशिवाय, बार्ज गाल कंस्ट्रक्टरवर 137 जण अडकले होते,यातील 38 जणांना वाचवण्यात आले आहे. तर, इतर दोन जहाजांपर्यंत लवकरच मदत पोहोचवली जाईल.

समुद्रात अडकलेल्या जहाजांची स्थिती

गॉल कंस्ट्रक्टर
नेव्हीचे प्रवक्ते मेहुल कर्णिक यांनी सांगितले की, बार्ज P-305 वर बचावकार्य सुरू आहे आणि लवकरच सर्व लोकांना सुरक्षित काढले जाईल. बार्ज गाल कंस्ट्रक्टरवर 137 जण अडकले आहेत. हे जहाज कोलबा पॉइंटपासून 48 नॉटिकल मैल उत्तरेकडे अडकले आहे. त्या जहाजावर अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी इमरजंसी नाव वॉटर लिलीला पाठवले आहे. याशिवाय, CGS ,सम्राटदेखील मदतीसाठी जात आहे.

बार्ज SS-3 आणि ऑईल रिग सागर भूषण

सागर भूषणवर 101आणि बार्ज SS-3 वर 196 लोकं अडकली आहेत. ही दोन्ही जहाज पिवाव पोर्टपासून 50 नॉटिकल मैल दक्षिण-पूर्वमध्ये अडकले आहेत. तिकडे मदत पाठवली जात आहे. INS तलवारला रेस्क्यू मिशनसाठी पाठवण्यात आले आहे. नेव्हीचे सर्विलांस एअरक्राफ्ट P8I आणि हेलिकॉप्टर्सद्वारे रेस्क्यू मिशनवर लक्ष्य ठेवले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...