आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:मुंबई महानगरपालिकेच्या दोनशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू...

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृत कर्मचारीऱ्यांच्या वारसांना महापालिका देणार विमाकवच

कोरोनामुळे मुंबई महानगरपालिकेच्या २०० पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभाग, सफाई विभाग, आरोग्य विभाग, जल विभागाच्या कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश यात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना आपले कर्तव्य बजावणाऱ्या मुंबई महापालिकेच्या जवळपास २२० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. .

कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या ज्या कर्मचारी आणि रूग्नांचा मृत्यू झालेला आहे अश्या कर्मचारी आणि अधिकारी यांना महापालिका विमा कवच देत आहे असे महापालिकेचे अधिकारी सांगतात. मात्र यातल्या फक्त ९६ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच विमा कवचाचा लाभ मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उर्वरित मृत कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या अधिकारी देत आहेत.

कोरोनाच्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, माग काढणे, प्रतिबंध, चाचणी, उपचार आणि मदत कार्ये या कार्यवाहीशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत महानगरपालिकेच्या विविध प्रवर्गातील कर्मचारी आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंत्राटी कामगार, बाह्य स्त्रोतांद्वारे घेतलेले रोजंदारी, मानसेवी कर्मचारी यांचा कोरोनामुळे संबंधित कर्तव्य बजावताना, कोरोनामुळे मुळे मृत्यू झाल्यास अशा प्रकरणांमध्ये 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...