आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन आर्थिक वर्ष:93 टक्क्यांहून जास्त कंपन्या यंदा नियुक्त्या वाढवतील, टॉप सीईओना भरभराटीची आशा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी खर्च वाढवणे आणि नवीन आर्थिक वर्षात नियुक्त्या वाढवण्याची योजना आखू लागले आहेत. २०२२-२३ मध्ये त्यांच्या कंपन्यांची विक्री महामारीपूर्वीची पातळीही आेलांडेल, अशी अपेक्षा या सीईआेंना वाटते. संपूर्ण देशात २९ सीईआेंवर बिझनेस स्टँडर्डने केलेल्या पाहणीत ८६ टक्के सीईआे म्हणाले, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये क्षमता विस्तार करण्याचा विचार आहे. कारण चांगल्या विक्रीची आम्हाला अपेक्षा वाटते.

आर्थिक वर्ष २०२१ व २०२२ मध्ये मंदीचा अनुभव घ्यावा लागला होता. त्यापैकी सुमारे ९३ टक्के सीईआे अधिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची योजना आखली जात आहे. सीईआेंमधील ही भावना सकारात्मक आहे. ग्राहकांच्या क्रयशक्तीमधील वाढीचे चित्र लक्षात घेतल्याने सीईआेंच्या आशा वाढल्या आहेत. ९६.६ टक्के सीईआेंचे हेच मत आहे. सुमारे ४१.४ टक्के उत्तरदात्यांनी आपल्या कंपनीला २० टक्क्यांहून जास्त लाभ होईल.

वाढत्या किमतीमुळे कंपनी, सीईआेंना मोठी चिंता पाहणीत सीईआेंनी इनपुट खर्चात वाढ, भूराजकीय प्रतिकूल परिस्थिती, रुपये विरुद्ध डॉलरमधील अस्थिरता व व्याजदरांतील वाढ तसेच तरलतेच्या अभावाचा उल्लेख केला. एक सीईआे म्हणाले, वाढती किंमत ही मोठी चिंता आहे. ती ग्राहक खर्चात घट करू शकते.

सीईआेंचे मत टक्क्यांत {५५.२ टक्के योजनांना अमलात आणण्यासाठी निधी संकलनाची योजना बनवतायेत. {८६.२% भारताचा यंदा आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी जगात सर्वात महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदय.