आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठा खुलासा:दहापेक्षा जास्त भाजप आमदार नाराज, लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील; जयंत पाटील यांचा खुलासा

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपची धमकी अन माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपमधील दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा धक्कादायक खुलासा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. एका वृत्त वाहिणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून भाजपमधील काहीजण आमच्याशी चर्चा करत आहेत. भाजपमध्ये त्यांना योग्य स्थान दिलं जात नसल्याने ते नाराज आहेत. ते सर्व आमदार राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असून, लवकरच त्यांना पक्षप्रवेश होईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

भाजपची धमकी अन माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी मुश्रीफ म्हणाले की, राजीव आवळे हे जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार आहेत. पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी पक्षातून राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपने धमक्या देऊन त्यांचा पक्षप्रवेश करुन घेतला. आवळे यांच्यापासून सुरुवात होत आहे. यापुढे अनेकजण भाजपमधून राष्ट्रवादीत येतील, असे मुश्रीफ म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...