आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉर्निंग न्यूज ब्रीफगोटाबाया राजपक्षे श्रीलंकेत परतले:राज्यात थंडी आणि धुक्याचा कहर; तर काश्मीर खोऱ्यात नवीन विक्रम, संजय राऊत यांचे वॉरंट रद्द!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज शनिवार 7 जानेवारी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथी

पाहुयात आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी....

गोटाबाया राजपक्षे दुबईहून श्रीलंकेत परतले

श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे दुबईहून मायदेशात परतले आहेत. श्रीलंकेची अर्थव्यवस्था सांभाळू न शकल्यामुळे गेल्या वर्षी राजपक्षे यांना सत्ता सोडावी लागली होती. देशातील स्थिती नियंत्रणात आल्याचे दिसताच ते श्रीलंकेत परतले होते. श्रीलंकेत परतल्यानंतर त्यांनी दुबईचा पहिला विदेश दौरा केला. वाचा सविस्तर

जानेवारीत 28,096 कर्मचाऱ्यांची कपात

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रासाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली ठरलेली नाही. कारण बऱ्याच कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. ट्रॅकिंग वेबसाइट ‘लेऑफ्स ट्रॅकर’च्या आकड्यानुसार, 2023 च्या पहिल्या पाच दिवसातच जगभरात तंत्रज्ञानाच्या 24 कंपन्यांनी 28,096 कर्मचाऱ्यांची कपात केली.

वाचा सविस्तर

राज्यात थंडी आणि धुक्याचा कहर

सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट अनुभवायला मिळाली. राजधानी काही ठिकाणी तापमान 1.8 अंशांपर्यंत घसरले होते. धुके, कमी दृश्यमानता व खराब हवामानाचा फटका रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीला बसला. नाशिक-औरंगाबादसह अनेक शहरांत विमान-रेल्वे विलंबाने मिळाल्याने रेल्वे व विमान वाहतुकीला फटका बसला आहे. वाचा सविस्तर

30 सप्टेंबरपर्यंत पुन्हा रखडली जनगणना

देशात जनगणनेची प्रक्रिया पुन्हा एकदा 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. देशभरात राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर एनपीआर अपडेट करण्याची प्रक्रिया 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत होणार होती, पण कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाकडून राज्यांना पाठवलेल्या पत्रात प्रशासकीय मर्यादा 30 जून 2023 पर्यंत बंद केली जाईल. वाचा सविस्तर

काश्मीर खोऱ्यात थंडीचा नवीन विक्रम

भारत-चीन संघर्षादरम्यान श्रीनगर-लेह महामार्गावरील जोजिला पास इतिहासात प्रथमच शुक्रवारी 6 जानेवारीपर्यंत खुला राहिला आहे. यापूर्वी तो 3 जानेवारीपर्यंत खुला होता. आता हा मार्ग एप्रिल-मे महिन्यातच खुला केला जाणार आहे. कारण इथे बर्फवृष्टी वेगाने होण्याची शक्यता आहे. काश्मीरला लडाखशी जोडणारा हा एकमेव महामार्ग आहे. वाचा सविस्तर

खासदार संजय राऊत हजर, वॉरंट रद्द

अब्रुनुकसान खटल्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजेरी लावली. त्यानंतर त्यांच्याविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी राऊत यांच्यावर हा खटला दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 24 जानेवारी रोजी होणार आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...