आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपले स्वागत. आज शनिवार 4 फेब्रुवारी असून माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी.
पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी...
साहित्य संमेलनात गोंधळ
वर्ध्यात कालपासून सुरू झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला गालबोट लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणाला उभे राहताच जोरदार गोंधळ झाला. महिलांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्याही भाषणावेळी घोषणाबाजी करत आंदोलन केले. विदर्भवाद्यांनी पत्रके फेकून वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्या. यानंतर पोलिसांनी त्यांना फरफटत बाहेर नेत ताब्यात घेतले. वाचा सविस्तर
10 दिवसांत 56% कोसळले अदानी समूहाचे शेअर्स
24 जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी ग्रुप ऑफ कंपनीज संदर्भात एक अहवाल जारी केला. यानंतर गेल्या 10 दिवसांत अदानी समूहाचे शेअर्स 56 टक्क्यांनी घसरले आहेत. तसेच संसदेपासून बाजारापर्यंत कल्लोळ माजलेला आहे. अमेरिकन स्टॉक एक्सचेंज डाऊ जोन्सने अदानी एंटरप्रायझेसला सस्टेनेबिलिटी इंडेक्समधून बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे अदानी समूहात SBI व LICने केलेल्या गुंतवणुकीवरून संसदेत सलग तीव्र गदारोळ झाला. विरोधकांनी या प्रकरणी संयुक्त संसदीय समिती किंवा सुप्रीम कोर्टाच्या पॅनलच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर
BBC डॉक्युमेंट्रीवरून केंद्राला नोटीस
BBCची बंदी घातलेल्या डॉक्युमेंट्री 'इंडिया: द मोदी क्वेश्चन'वर बंदी घालण्याबाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायालयाने याप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस पाठवली असून मूळ कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्राकडून तीन आठवड्यांत उत्तर मागितले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी एप्रिलमध्ये होणार आहे. वाचा सविस्तर
राज्यपाल पदाबाबत कॅप्टन अमरिंदर यांनी सोडले मौन
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी महाराष्ट्राचे पुढील राज्यपाल होण्याच्या सुरु असलेल्या अफवांवर आता मौन सोडले आहे. कॅप्टन यांनी याबद्दल आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याचे सांगितले आहे. परंतु त्यांनी हे नाकारलेही नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो काही निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असे कॅप्टन म्हणाले. पीएम सांगतील त्याठिकाणी मी जाईल. असेही ते म्हणाले. वाचा सविस्तर
'हेट स्पीच' होणार नाहीत, याची काळजी घ्या
हेट स्पीचच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले. 5 फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजित होणाऱ्या हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्देश दिले आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनास परवानगी दिल्यास हेट स्पीच होणार नाही याची खात्री करण्यास कोर्टाने सरकारले सांगितले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.