आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानमस्कार दिव्य मराठीच्या मॉर्निंग न्यूज ब्रिफमध्ये आपले स्वागत. आज गुरुवार 3 मार्च फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी. पाहुयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी.
धंगेकर, जगताप विजयी
पुण्यातील कसाबा पेठ मतदार संघात भाजपचा धक्कादायक पराभव झाला. या ठिकाणी 28 वर्षांच्या विजयाची परंपरा मोडित काढत मविआकडून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी. तर चिंचवडमध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला. अश्विनी जगताप 36 हजार 770 मतांनी विजयी झाल्या. वाचा सविस्तर
त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजपला पुन्हा बहुमत
ईशान्येतील 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरा आणि नागालँडचे निकाल जाहीर झाले आहेत. दोन्ही राज्यात भाजपला पुन्हा बहुमत मिळाले. नागालँडमध्ये भाजप आघाडीला 37 तर त्रिपुरामध्ये 33 जागा मिळाल्या आहेत. तर मेघालायमध्ये मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांचा NPP सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. NPP च्या खात्यात फक्त 26 जागा आल्या आहेत. वाचा सविस्तर
सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 14 मार्चला
राज्याच्या सत्तासंघर्षावरील कालची सुनावणी केवळ दोन तासांतच संपली. काल शिंदे गटाकडून अॅड. नीरज कौल यांनी युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर अॅड. हरीश साळवे यांनी बाजू मांडली. मात्र, काही कारणास्तव त्यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. आता होळीनंतर 14 मार्च रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे 14 मार्च लाच शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
अदानी प्रकरणी सुप्रीम कोर्टाची तज्ज्ञ समिती
अदानी - हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश ए. एम. सप्रे हे या समितीचे अध्यक्ष असतील. न्यायालयाने या समितीला प्रकरणाचा तपास सोपवण्यासह सेबीला स्टॉक्सच्या किंमतीत गैरव्यवहार झाल्याची चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. तसेच सेबीला हा अहवाल 2 महिन्यात द्यावा लागणार आहे. वाचा सविस्तर
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर SCचा निर्णय
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आता पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि CJI संयुक्तपणे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची निवड करतील. लोकशाही टिकण्यासाठी निवडणूक प्रक्रियेची स्पष्टता राखली पाहिजे असे न्यायमूर्ती के.एम. जोसेफ म्हणाले. एक समिती मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करेल. या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि CJI असतील. वाचा सविस्तर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.